Sunday, October 2, 2011

गांधी मला भेटला

'गांधी मला भेटला' ही १९८३मधे प्रसिद्ध झालेली पोस्टर कविता. पोस्टर दुमडल्यानंतर जी घडी हातात बसते तिचा हा फोटो. मूळ पोस्टर बघण्यातच खरी गंमत. त्याच्यावर बाळ ठाकूरांनी काढलेलं पाठमोऱ्या गांधीजींचं  चित्र आहे, मांडणी अशोक शहाण्यांची. आणि गांधीजींच्या पाठीमागे आपलं जे काही सामाजिक वास्तव उरलं त्याची कबुली म्हणजे ही गुर्जरांची कविता. या कवितेबद्दल जास्त काही आपण बोलू शकत नाही, कारण तिच्यासंबंधी खटला सुरू आहे-- ही कविता १९९४ मध्ये ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या द्वैमासिकात जुलै-ऑगस्टला परत प्रसिद्ध झाली, तेव्हा काही घोळ झाले, त्यासंबंधीची बातमी ह्या ब्लॉगवर दिली आहेच.

No comments:

Post a Comment